ग्रामसचिवालय हिंगणगाव बु.
"स्वच्छते कडून समृध्दी कडे, डिजिटल युगाकडे वाटचाल"
(स्थापना १९५९)
दृष्टीक्षेपात लोकसंख्या
एकूण लोकसंख्या
शिक्षित लोकसंख्या
अशिक्षित लोकसंख्या
कामगार लोकसंख्या
गावाबद्दल
गावाबद्दल माहिती व इतिहास!
कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक हे गाव आपल्या आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी ओळखले जाते. येथे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर,सदगुरू श्री नारायण स्वामी यांची संजीवन समाधी व सदगुरू जंगलीनाथ महाराज मठ हे श्रद्धेचे केंद्र असून, गावात अध्यात्माची सशक्त परंपरा जोपासली जाते. नांदणी तलाव हा शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरलेला असून, येथे ऊस व आले यांसारखी नगदी पिके भरभराटीने घेतली जातात. गावाने अवयवदान नोंदणी ग्रामसंकल्प करून सामाजिक जाणीवेचे उदाहरण घालून दिले आहे.
शैक्षणिक क्षेत्रात, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेली मॉडेल प्राथमिक शाळा, तसेच दर्जेदार शिक्षण देणारे रयत शिक्षण संस्थेचे नेहरू विद्यालय हे गावाच्या गौरवाचे प्रतीक आहेत. आरोग्यसेवेसाठी कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामस्थांच्या आरोग्याचे रक्षण करते.
सैन्य भरती होऊन देशसेवा करणे यात गावातील युवक अग्रेसर आहेत. देशसेवेची मोठी परंपरा आहे.
गावात विविध देवीदेवतांची मंदिरे असून, सर्व जातीधर्माचे लोक गुण्या-गोविंदाने एकत्र नांदतात. परस्परांच्या दुःखात सहभागी होत, विकासाच्या वाटेवर एकजुटीने वाटचाल करणारे हिंगणगाव बुद्रुक हे एक आदर्श आणि प्रेरणादायी गाव आहे.
उत्कृष्ठ सेवा
गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना
सूचना विभाग
तक्रार निवारण विभाग
अभिप्राय विभाग
- सरपंच मो नं : ९६७३१३९९९९
- ग्रामपंचायत अधिकारी : ७८७५४५२६०६
- ईमेल: hingangaonbgpkadegaon@gmail.com
- पत्ता मु. पो. हिंगणगाव बुद्रुक ता.कडेगांव जिल्हा सांगली.
महत्वाच्या लिंक
सूचना मिळावा
ग्रामपंचायतीच्या सूचना व बातम्या इमेल वर मिळवण्यासाठी येथे इमेल प्रविष्ठ करा!








